Jalgaon : पतीच्या निधनानंतर दोन मुलांच्या ताब्यावरून वाद; आईचा नातेवाईकांवर गंभीर आरोप

जानेवारी 4, 2026 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पती-पत्नीचा सुखी संसार सुरू असताना पतीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. यानंतर दोन मुलांच्या ताब्यावरून कुटुंबीयांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला असून, पीडित महिलेने सासरच्या मंडळींवर मारहाण, धमकी, बेकायदेशीरपणे मुलांना दूर नेणे व मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

New Project 2

जळगावमधील रहिवाशी असलेल्या पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे पती मिलिंद शशिकांत दलाल यांचे २३ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले असून त्यांना एक मुलगा चरण मिलिंद दलाल(वय ५) व एक मुलगी आराध्य मिलिंद दलाल (वय ७) अशी दोन मुलं आहेत. पती मिलिंद दलाल यांचे निधन झाल्यानंतर सासू, दोन नणंदा व त्यांचे पती यांनी संगनमत करून मला मारहाण करत घराबाहेर काढले. यावेळी तिच्या दोन्ही मुलांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. महिलेने यापूर्वी शनीपेठ व वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून न्यायालयातही धाव घेतल्याचे नमूद केले आहे.

संबंधित मंडळींनी “मुलं हवी असतील तर कोर्टात जा” असे सांगत, मुलांना वरणगाव येथे नेऊन शाळेत दाखल केले. मात्र मुलांच्या प्रवेशाबाबत आईला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप असून नंतर मुलांना भेटण्यासाठी गेल्यावर तिच्याशी शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पीडित महिलेनं तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच न्यायालयाने मुलांचा ताबा आईला देण्याचे आदेश दिले असतानाही, प्रत्यक्षात मुलांना भेटू दिले जात नसल्याचे तिने सांगितले.

”जर तुला दोन्ही मुले हवे असतील तर मिलींदची जी पॉलिसी आहे त्यामध्ये आम्हांला अर्धा हिस्सा दयावा” लागेल असंही पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं असून सासू व दोन्ही नणंदा व त्यांचे पती यांच्यावर शंका उपस्थित करत दोन्ही मुलांचा घातपात केल्याचा संशय पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारदार महिलेने अर्जात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जर आपल्या मुलींना काहीही अनुचित प्रकार घडला, तर त्यास संबंधित नातेवाईक जबाबदार राहतील. आता या तक्रारीवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now