जळगावमार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्स्प्रेसला मुदतवाढ ; थांबे अन् वेळापत्रक जाणून घ्या

जानेवारी 4, 2026 8:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमार्गे धावणाऱ्या आणखी एका विशेष ट्रेनला मुदतवाढ मिळाली आहे. पश्चिम रेल्वेने राजकोट-महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत.ही रेल्वे जळगावमार्गे धावणाऱ्या असून, त्यामुळे प्रवाशांची सोय होईल.

train

०९५७५ राजकोट-महबूबनगर ही रेल्वे दर सोमवारी राजकोट येथून दुपारी १.४५ वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२८ वाजता जळगावात थांबा घेऊन मेहबूबनगरसाठी रवाना होते. ही रेल्वे आता २३ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे.

०९५७६ महबूबनग्र-राजकोट रेल्वे दर मंगळवारी रात्री ११ वाजता महबूबनगर येथून सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१२ वाजता जळगावी थांबा घेते. ही रेल्वे आता २४ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. दोन्ही रेल्वेंना जळगावात थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळेल.

या स्थानकावर आहेत थांबा?
या गाडीला राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचेगुडा, शहादनगर, जडचरला आणि महबूबनगर या ठिकाणी थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now