जळगावात थंडीचा जोर कायम; पारा ९ अंशावर स्थिर, आता पुढे…

जानेवारी 4, 2026 8:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२६ । जळगावमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला थंडीचा जोर कायम असून गेल्या चार दिवसांपासून जळगाव शहराचे किमान तापमान ९.१ अंशांवर स्थिरावले आहे. यातच हवामानात बदल होणार असून किमान तापमानाचा पारा वाढण्याची शकता आहे. ज्यामुळे थंडीची स्थिती सौम्य राहील.

tapman thandi

जळगावचा पारा मागच्या चार दिवसापासून ९ अंशांवर असला तरी भासमान अधिक आहे. पहाटेच्यावेळी ७ अंशांवर भासमान जाणवते आहे. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळत आहे.

४ रोजी आकाश आणि प्रकाश सुस्पष्ट राहू शकतो. मात्र ५ ते ६ जानेवारी दरम्यान आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, थंडीची स्थिती सौम्य राहील. किमान तापमान ९ ते १३ अंशांपर्यंत राहील, तर कमाल तापमान २७ ते ३१ अंशांपर्यंत जाईल. सकाळी हलके धुके आणि रात्री सौम्य थंडी अनुभवण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now