गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमीत्त अभिवादन

जानेवारी 3, 2026 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उेाळा देतांना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्या काळातील सामाजिक विरोध, रूढीवादी मानसिकता यांचा धाडसाने सामना करत महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला.

svt

सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने पुण्यात १८ शाळा स्थापून मुली व वंचित समुदायासाठी शिक्षणाची उजळणी केली.

याशिवाय, डॉ. वारके यांनी फुले यांचे सामाजिक न्याय, समानता, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह आणि बालहत्या प्रतिबंध यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now