⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ‘युवा जोडो संपर्क अभियानाला’ यावलमध्ये सुरवात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ‘युवा जोडो संपर्क अभियानाला’ यावलमध्ये सुरवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्या युवक राष्ट्रवादी कॉंग्रेच्या माध्यमातून आयोजित युवा जोडो संपर्क अभियानाला यावलमध्ये फॉर्म भरून सुरवात करण्यात आली.

या कर्यक्रमासाठी युवक जिल्ह्या अध्यक्ष तथा जिप सदस्य रवींद्र पाटील तसेच राष्ट्रवादी युवकचे समन्वय तथा या कार्यक्रमाचे निरीक्षक आबा पाटील जिल्ह्याच्या वतीने आले होते. आबा पाटील यांनी संपर्क जोडो अभियानची माहिती व स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. जिल्ह्या युवक अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी संघटना मजबुती साठी हे एक महत्वाचा दुआ आहे. होणाऱ्या आगामी निवडणुकीत या संपर्क अभियानाची मदत होणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात अतुल पाटील यांनी संघटनेचे महत्व सांगून बूथचे महत्व सांगून निवडणूका जिंकण्यासाठी  युवा संपर्क अभियानाची महत्वाची भूमिका राहील, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मुकेश येवले यांनी केले. त्यात त्यांनी पक्षचे चिन्ह घरा-घरा पर्यंत पोहचविण्याची व नवीन युवकांना संघटनेत सामील करून घेण्याची या अभिनव आशा युवा जोडो अभियानाची मदत होईल असे सांगितले.

या कार्यक्रमात सूत्र संचालन युवक अध्यक्ष ऍड. देवकांत बाजीराव पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

या प्रसंगी कार्यक्रमाला याआदिवासी आघाडी चे एम बी तडवी, नगर सेवक राकेश कोलते ,शहर अध्यक्ष करीम मण्यार, युवक समन्वक, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंन्दे,  किशोर पाटील, जिल्ह्या युवक उपाध्यक्ष दीपक पाटील, चंद्रकांत येवले, जिल्ह्या युवक सरचिटणीस विनोद पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र सरोदे, विध्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार, गिरीष पाटील, ललित तेली, राहुल चौधरी, हेमंत फेंगडे, भूषण नेमाडे, भरत पाटील, जमीर पटेल, पवन खर्चे, गाणी खान, याच बरोबर महिला अध्यक्ष दोरका पाटील, शामल भावसार उज्वला कोळी, हेमंत दांडेकर, रोहित इंधटे, दीपक तडवी आदी कार्यक्रमास उपस्थित होते

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.