जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२५ । सोने आणि चांदी खरेदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. वर्षभरापासून तेजीत असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमती घसरल्याची नोंद झाली. दुसरीकडे चांदीत देखील मोठी घसरण झाली.

आज बुधवारी, चांदीच्या भावात ८ टक्के (सुमारे २० हजार रुपये) घसरण होऊन ती प्रति किलो २,३२,२२८ रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात ०.४ टक्के घसरण होऊन ते प्रति १० ग्रॅम १,३६,१२४ रुपयांवर आले आहे. दरम्यान, चांदीच्या किमतीतील ही घसरण चांदी विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर झालेल्या आक्रमक नफा वसुलीमुळे होत असल्याचे दिसून येत आहे.

मागील काही वर्षांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. आता सोन्यासह चांदीचे दर पुन्हा एकदा घसरत असल्याची नोंद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यास सुरूवात केली आहे.
त्याचा परिणाण सोन्याच्या किंमतीवर पडलाय. जगभरातील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती स्थिरतेकडे जात आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतोय. जागतिक बाजारात पुढेही अशीच स्थिती राहिली तर सोनं अन् चांदीच्या दरात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पण जर नवीन काही संकट ओढावले तर २०२६ मध्येही सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.












