मुंबई, पुण्याहून प्रयागराजसाठी विशेष गाडी.. जळगाव, भुसावळ असेल थांबा

डिसेंबर 25, 2025 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई ते प्रयागराज तसेच पुणे ते प्रयागराज दरम्यान अतिरिक्त एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

train

मुंबई ते प्रयागराज दरम्यान, एकेरी विशेष अनारक्षित क्र. ०१००७ ही गाडी २६ डिसेंबर रोजी मुंबई येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी, उरई, कानपूर सेंट्रल, गोविंदपुरी आणि फतेहपूर येथे थांबे असतील.

पुणे ते प्रयागराज दरम्यान एकेरी विशेष गाडी (क्र. ०१४११) २७ डिसेंबर रोजी पुणे येथून रात्री ७:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:१० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. पुणे ते प्रयागराज दरम्यान आणखी विशेष गाडी (क्र. ०१४९९) ३१ डिसेंबर रोजी पुणे येथून रात्री १९:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २:१० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे व संरचना गाडी क्रमांक ०१४११ प्रमाणेच असतील.

या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी, उरई, कानपूर सेंट्रल, गोविंदपुरी आणि फतेहपूर येथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now