भयंकर ! कंटेनरच्या धडकेनंतर खाजगी बसला भीषण आग; 17 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

डिसेंबर 25, 2025 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । कर्नाटकातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे.. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ एक भीषण बस अपघात झाला. बेंगळुरूहून गोकर्णला जाणारी खाजगी एसी स्लीपर बस कंटेनर लॉरीशी धडकली आणि त्यात आग लागली.या अपघातामध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २२ जण जखमी झाले आहेत.

New Project 5 1

खासगी बस बंगळुरूहून गोकर्णाला निघाली होती. त्याचवेळी एक कंटेनर बंगळुरूकडे निघाला होता. हिरियुर येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटला अन् डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेला खासगी बसला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की बसचा चक्काचूर झाला अन् आग लागली.

खासगी स्लीपर बसमध्ये आगीचा तांडव उडाला. कंटेनर खासगी बसच्या मधोमध जोरात धडकल्याने आग लागली, त्यात अनेकजण अडकले. यामध्ये १७ जणांचा होरपळून जिवंत मृत्यू झाला.पहाटेची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेतच होते. एका क्षणात बसमध्ये सगळीकडे आग पसरली. आरडाओरड आणि किंचाळ्याने परिसर हादरला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अन् अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळावर पोहचल्या. तात्काळ बचावकार्य सुरू झाले. २२ जणांना वाचवण्यात यश आले. ते सर्वजण जखमी आहेत, त्यांच्यावर हिरियुर आणि चित्रदुर्गातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या कंटेनर चालकाची चूक असल्याचे दिसतेय.हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now