आनंदवार्ता ! भुसावळ, जळगावमार्गे धावणार ‘हिवाळी विशेष गाड्या’; कधी अन् कुठे धावणार? वाचा डिटेल्स

डिसेंबर 12, 2025 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२५ । नाताळ आणि नवीन वर्षामुळे अनेक जण फिरण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमरावती-पुणे, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या तीन मुख्य मार्गांवर ‘हिवाळी विशेष गाड्या’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भुसावळ आणि जळगावमार्गे या गाड्या धावणार असून ज्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

train

अमरावती-पुणे-अमरावती
साप्ताहिक विशेष गाडीच्या एकुण सहा फेऱ्या होणार आहे. त्यानुसार या विशेष गाडीचा कालावधी २१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी असेल. ही गाडी अमरावती येथून दर रविवारी दुपारी १२ वाजता सुटेल व पुण्यात मध्यरात्री १२.१५ वाजता पोहोचेल. पुणे-अमरावती विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात धावेल. ती पुण्यातून दर शनिवारी संध्याकाळी ७.५५ वाजता सुटेल तर अमरावतीला रविवारी सकाळी ९.२५ वाजता येईल.

मुंबई ते नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या होतील. ही विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात धावेल. ती मुंबई येथून शनिवारी रात्री १२.३० वाजता सुटेल व नागपूरला शनिवारी दुपारी ३.३० वाजता येईल. दरम्यान, ०१००६ नागपूर ते मुंबई ही विशेष गाडी नागपूर येथून दर शनिवारी संध्याकाळी ६.१० वाजता सुटेल व मुंबईला रविवारी सकाळी ८.२५ वाजता येईल. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात धावेल. ती दर शुक्रवारी रात्री ८.३० वाजता पुण्यातून सुटेल व दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी २.०५ वाजता येईल. तसेच नागपूर ते पुणे विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात धावेल. ती नागपूर येथून दर शनिवारी दुपारी ४.१० वाजता सुटेल.

असे आहे वेळाफाक
नागपूर-मुंबई एक्सप्रेस (०१००६) भुसावळला रात्री १२.३० वाजता येईल. मुंबई – नागपूर (०१००५) विशेष गाडी मुंबईतून रात्री १२.३० वाजता सुटेल ही गाडी भुसावळ जंक्शनवर सकाळी ७.०५ वाजता येईल. पुणे-नागपूर साप्ताहिक गाडी पुण्यातून शुक्रवारी रात्री ८.३० वाजता सुटेल. ती भुसावळला ६.३० वाजता येईल. नागपूर-पुणे गाडी (०१४०२) भुसावळला रात्री ११.२५ वाजता तर जळगावला ११.५३ वाजता येईल. अमरावती-पुणे गाडी (०१४०४) भुसावळला दुपारी ३.४० वाजता, जळगावला दुपारी ४.०८ मिनिटांनी येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now