जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अलीकडे पोलिसांनी अनेक दुचाकी चोरांना पकडले असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहे. आता अशीच एक कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ज्यात गॅरेज चालकच निघाला दुचाकी चोर निघाला.

बनावट चावीच्या साहाय्याने दुचाकी चोरी करणाऱ्या माजीद अली लियाकत अली (रा. उस्मानिया पार्क) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजचा व्यवसाय होत नसल्याने त्याने बनावट चावीचा वापर करून यापूर्वीही चार दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्यातील तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरून दुचाकी चोरी झाल्याच्या घटना एका पाठोपाठ घडल्या. या दुचाकी माजीद अली लियाकत अली याने चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड राहुल यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ. अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, मुबारक तडवी, बशीर तडवी यांनी माजीदअली याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
बनावट चावीचा वापर माजीदअली याचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. गॅरेज व्यवसाय चालत नसल्यामुळे त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली. बनावट चावीच्या साहाय्याने तो दुचाकी चोरी करीत होता.











