Jalgaon : युवकाच्या खून प्रकरणात पाच संशयितांना अटक; १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

डिसेंबर 5, 2025 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल शहरातून बोरावल जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ जळगाव येथील समता नगरातील तुषार चंद्रकांत तायडे (वय १९, रा. समता नगर, जळगाव) या युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेच्या मदतीने पाच संशयितांना अटक करत त्यांना न्यायालयात हजर केल्यावर १० डिसेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

crd

समाज माध्यमावर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून तुषार चंद्रकांत तायडे (वय १९, रा. समता नगर, जळगाव) याला मंगळवारी सायंकाळी जबर मारहाण झाली होती. तो यावल मार्गे जळगावला जात असताना हा हल्ला झाला होता. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील संशयित विक्रम पंडितराव सोनवणे (वय ४६), अविनाश उर्फ अविनाथ सुकलाल सोनवणे (वय २२), विजय रूपचंद सोनवणे (वय २७, तिघे रा. सुजदे, ता. जि. जळगाव), नीलेश पंडित कोळी (वय ३३, रा.बोरनार, ता. जळगाव), कल्पेश नीलेश इंगळे (क्य २१ रा. आसोदा) या पाच जणांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी यावल न्यायालयात हजर केल्यावर प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एका संशयिताचा शोध सुरू

दरम्यान या गुन्ह्यातील राहुल सोनवणे हा एक संशयित पसार आहे. त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेसह यावल पोलिसांचे विशेष पथक तीन दिशेने रवाना झाले आहे. लवकरच संबंधिताला अटक होईल, असे पोलिस निरीक्षक धारबळे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now