अत्यंत दुर्दैवी! पत्र्याच्या शेडमध्ये खेळताना शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

डिसेंबर 4, 2025 1:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा वीज प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील येथे सुजदे येथे घडली. प्रेम नरेंद्र सोनवणे असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

prem

प्रेम हा दुपारी घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. पत्र्याच्या शेडवरील मुख्य वीज प्रवाह असलेली वायर तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये वीज प्रवाह उतरला. त्याचवेळी प्रेम त्या ठिकाणी खेळत असताना त्याला शॉक लागला. शेजाऱ्यांना प्रेम अत्यवस्थ अवस्थेत दिसल्यानंतर लागलीच वीज प्रवाह खंडित करून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती करता तर आई दीपाली सोनवणे या गृहिणी आहे. प्रेमला लहान भाऊ आहे. त्याच्या मृत्यूमुळे आई- वडिलांवर मोठा आघात झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now