जळगाव जिल्ह्यात दोन तासात ६.१ टक्के मतदानाची नोंद

डिसेंबर 2, 2025 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. सकाळी ७:३० ते ९:३० या दोन तासात जिल्ह्यात एकूण ६.१ टक्के मतदान झाले आहे.

loksabha election jpg webp

जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींच्या एकुण ४५२ जागांसाठी आज दि. २ डिसेंबर सकाळी ७.3० वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी एकुण ९६७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून जिल्हयात एकूण ८ लाख ८९ हजार ९१४ इतके मतदार मतदानाचा हक्क् बजावणार आहे. यात पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ५० हजार ८९३ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ लाख ३८ हजार ९३८ इतकी आहे तर ८३ इतर मतदारांचा समावेश आहे. दरम्यान मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, सकाळी ७:३० ते ९:३० या दोन तासात जिल्ह्यात एकूण ६.१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये जिल्ह्यात ३० हजार ४७९ पुरुषांनी तर २२ हजार ४९५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दोन तासाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान यावल येथे १०.८७ टक्के झाले. तर सर्वात कमी टक्के मतदान पाचोरा येथे ३.६५ इतके झाले.

दोन तासात जिल्ह्यात कुठे किती टक्के मतदान?

जामनेर 6.29 टक्के, भुसावळ 5.12 टक्के, यावल 10.87 टक्के, फैजपूर 10.03 टक्के, पाचोरा 3.65 टक्के, वरणगाव 8.08 टक्के, अमळनेर 5.59 टक्के, चाळीसगाव 6.19 टक्के, सावदा 5.08 टक्के, चोपडा 5.47 टक्के, रावेर 8.31 टक्के, भडगाव 4.48 टक्के, धरणगाव 6.50 टक्के, एरंडोल 6.97 टक्के, पारोळा 5.15 टक्के, नशिराबाद 6.26 टक्के, मुक्ताईनगर 5.20 टक्के, शेंदुर्णी 6.69 टक्के.

एकूण – ६.१ टक्के मतदान

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now