महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईसाठी जळगाव, भुसावळ मार्गे धावणार विशेष गाड्या ; वेळापत्रक जाणून घ्या

नोव्हेंबर 20, 2025 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२५ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. या दरम्यान पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना जळगाव, भुसावळ चाळीसगाव थांबा असणार आहे.

train

नागपूर ते मुंबई एकेरी गाड्या

गाडी क्र. ०१२६० ही रेल्वे ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२६२ ही रेल्वे ४ रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ गाडी ५ रोजी नागपूर येथून ८.०० वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२६६ ही गाडी ५ रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे थांबे असतील.

मुंबई ते नागपूर एकेरी गाड्या

क्र. ०१२४९ ही गाडी ६ रोजी मुंबई येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. क्र. ०१२५३ ही गाडी ७ रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

क्र. ०१२५१ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल. क्र. ०१२५५ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२५७ दि. ८ रोजी मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाड्यांना चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर येथे थांबे असतील.

अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाड्या

क्र. ०१२१८ ५ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२१७ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now