जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत असून येत्या २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत.

होणाऱ्या निवडणुकांमध्ये भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा मिळून एकूण १६ नगर परिषदांचा तसेच शेंदुर्णी आणि मुक्ताईनगर नगरपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील या १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत? याबाबत जाणून घ्या..

३७७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार अखेर जिल्ह्यात सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी एकूण सुमारे ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्षांच्या १८ जागांसाठी एकूण २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. असे एकूण ३७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान भुसावळमधील अखेरच्या दिवशी दाखल अर्जांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही.
पक्षनिहाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – 18 नगरपरिषद
चाळीसगाव नगरपरिषद
- भाजप: प्रतिभा मंगेश चव्हाण
- महाविकास आघाडी: पद्मजा राजीव देशमुख
- राष्ट्रवादी (अजित पवार): समाधान पाटील
पाचोरा नगरपरिषद
- शिवसेना शिंदे: सुनिता किशोर पाटील
- भाजप: सुजेता दिलीप वाघ
भडगाव नगरपरिषद
- भाजप: सुशीला शांताराम पाटील
- शिवसेना शिंदे: समीक्षा लालचंद पाटील
अमळनेर नगरपरिषद
- शिवसेना शिंदे: डॉ. परीक्षित बाविस्कर
- शहर विकास आघाडी: जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर
भुसावळ नगरपरिषद
- भाजप–शिंदे: रजनी संजय सावकारे
- राष्ट्रवादी (ठाकरे गट): गायत्री चेतन भंगाळे
- राष्ट्रवादी (अजित पवार गट): अर्शिया अन्सारी
- काँग्रेस: सविता प्रवीण सुरवाडे
जामनेर नगरपरिषद
- भाजप: साधना गिरीश महाजन
- महाविकास आघाडी: ज्योत्स्ना विसपुते
चोपडा नगरपरिषद
- शिवसेना शिंदे/काँग्रेस: नम्रता सचिन पाटील
- भाजप/राष्ट्रवादी अप: साधना नितीन चौधरी
- शिवसेना ठाकरे: रोहिणी प्रकाश पाटील
वरणगाव नगरपरिषद
- शिवसेना शिंदे: तृप्ता समाधान महाजन
- भाजप: शामल झांबरे
- महाविकास आघाडी: राजेंद्र चौधरी
धरणगाव नगरपरिषद
- महायुती: वैशाली विनय भावे
- महाविकास आघाडी: लिलाबाई सुरेश चौधरी
यावल नगरपरिषद
- महाविकास आघाडी: छाया पाटील
- शिवसेना शिंदे: स्वाती मनोहर पाटील
नशिराबाद नगरपरिषद
- भाजप/शिंदे: योगेश पाटील
- राष्ट्रवादी अजित पवार: गणेश चव्हाण
- शिवसेना ठाकरे: राजू रोटे
एरंडोल नगरपरिषद
- भाजप/शिंदे: डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर
- राष्ट्रवादी अजित पवार: गायत्री दीपक पाटील
- शिवसेना ठाकरे: रघुनाथ ठाकूर
पारोळा नगरपरिषद
- भाजप/शिंदे: चंद्रकांत पाटील
- शिवसेना ठाकरे/राष्ट्रवादी अप: अंजली करण पवार
फैजपूर नगरपरिषद
- भाजप: दामिनी पवन सराफ
- काँग्रेस: नीलिमा केतन किरंगे
- राष्ट्रवादी अजित पवार: सुमय्या शेख कुरबान
सावदा नगरपरिषद
- भाजप/शिंदे: रेणुका राजेंद्र पाटील
- राष्ट्रवादी अजित पवार: सुभद्राबाई बडगे
रावेर नगरपरिषद
- भाजप: संगीता भास्कर महाजन
- शिवसेना ठाकरे: रवींद्र मनीषा पवार
मुक्ताईनगर नगरपंचायत
- भाजप: भावना ललित महाजन
- शिवसेना शिंदे: संजना चंद्रकांत पाटील (फॉर्म A), भारती छोटू भोई (फॉर्म B)
शेंदुर्णी नगरपंचायत
- भाजप: गोविंद अग्रवाल
- राष्ट्रवादी शरद पवार: उज्वला सतीश काशीद









