जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव मार्गे धावणारी उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस सेवा आठवड्याऐवजी आता आठवड्यातून तीन वेळा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

या रेल्वेत आधुनिक एलएचबी कोच, आरामदायी आसने, पेंट्री कार, ई-केटरिंग सेवा आहे. रेल्वे क्रमांक १९०२१ आता रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ७:१० वाजता उधना येथून सुटेल आणि दुपारी १२.४५ वाजता जळगाव येथे पोहोचेल.

त्यानंतर ब्रह्मपूरसाठी रवाना होईल. तसेच रेल्वे क्रमांक १९०२२ ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ब्रह्मपूरहून रात्री ११:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २.३८ वाजता जळगाव पोहोचेल आणि उधनासाठी रवाना होईल. या गाडीला उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, नागपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, महासमुंद, रायगडा आणि ब्रह्मपूर येथे प्रमुख थांबे असतील. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.









