महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संदेशामुळे खळबळ, पण.. ; भुसावळ-जळगाव स्थानकांवर गाडीची तपासणी

नोव्हेंबर 12, 2025 12:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२५ । लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने देशात खळबळ उडाली. या स्फोटानंतर महाराष्ट्रासह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडूनही महत्त्वाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा तैनात केली जातेय. दिल्ली ब्लास्टमुळे महाराष्ट्र हाय अलर्टवर असतानाच महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला अन् एकच खळबळ उडाली. भुसावळ रेल्वे स्थानकावर माहिती मिळताच पोलिसांनी तपास करून रेल्वे पुढे रवाना केली आहे

jltr

मुंबईहून बनारसकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली. एक्सप्रेसमधील एका कोचच्या शौचालयात महानगरी एक्सप्रेसला बॉम्बने उडून देण्याची धमकी देणारा संदेश लिहिलेला आढळला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली आहे.

एक्सप्रेस बॉम्ब असल्याची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. एक्सप्रेसची तपासणी जळगाव आणि भूसावळ स्थानकावर करण्यात आली. महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश आढळून आल्याने रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली असता, ही केवळ अफवा असल्याचं समोर आली आहे. पोलिसांनी तपासणी करून रेल्वे पुढे रवाना झाली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now