फायदा दिसला ८०० रुपयाचा, नंतर गमावले ३ लाख ६० हजार ; जळगावातील क्लार्कला असा लावला चुना?

नोव्हेंबर 8, 2025 2:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असून झटपट पैसे कमविण्याचे आमीष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे. असाच एक प्रकार जळगाव शहरातून समोर आला असून व्हिडिओ लाइकवर पैसे कमवाचे आमिष दाखवून एका एका कॉलेजमधील क्लार्कला ३ लाख ६० हजार रूपयांचा सायबर ठगांनी चुना लावला. सुरुवातीला २००० रुपयांवर ८०० रुपये फायदा दिसला व याच आमिषातून ते गंडवले गेले.

state bank fraud of rs 1 5 crore crime against 17 persons including bank valuers jpg webp

नेमका प्रकार काय?
जळगावमधील ज्ञानदेव नगरातील योगेश रमेश सोनार रमेश सोनार (रा. ज्ञानदेवनगर, वय ४५) हे शहरातील एका कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या ५ तारखेला ‘टेलिग्राम’ या सोशल मीडिया अॅपवर एक संदेश आला. या संदेशात व्हिडिओ / पिक्चर लाइक करा आणि प्रत्येक लाइकला १०० रुपये कमवा असे सांगण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी टास्क पूर्ण करून ६६० रुपये कमावले. जे त्यांच्या खात्यात जमा झाले.

यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा ‘इकॉनॉमी टास्क’ पूर्ण करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला फिर्यादीने कॅनरा बँकेतून २ हजार पाठवले असता त्यांना २८०० रूपये जमा झाले. त्यानंतर ५ हजार पाठवले असता ७५०० रुपये जमा झाले. त्यांना पैसे वाढल्याचा विश्वास बसला. त्यानंतर ठगांनी त्यांना २८ हजार रूपये भरल्यास ४२ हजार रूपये मिळतील, असे आमिष दाखवले.

या मोहात अडकून योगेश सोनार ७ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ३ लाख ६० हजार रूपये वेगवेगळ्या बँक खात्यांत ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर जेव्हा ‘मिन्ट’ अकाउंट चेक केले तेव्हा बॅलन्स मायनस दीड लाख दाखवत होता. याबद्दल विचारले असता, चोरट्यांनी चुकीची पद्धत वापरल्याने पैसे लॉस झाले असे सांगत डेटा रिपेअरसाठी दीड लाख भरण्याची मागणी केली. यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now