जळगाव लाईव्ह न्यूज । भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला असून या विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, या अविस्मरणीय विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी जपण्यासाठी, नाशिक येथील उद्योग भवनाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

एनएसआयसीचे व्यवस्थापक बर्नवाल, दिल्लीतील ऑडिट टीमचे सदस्य, वरिष्ठ लेखा अधिकारी दविंदर कुमार आणि सल्लागार शेखर शर्मा आणि एच.एस. संधू उपस्थित होते.

एनएसआयसीचे उत्तम जी यांच्या मोलाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून, यासाठी आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत,” अशी प्रेरणादायी साद घातली. हा कार्यक्रम केवळ एक विजयोत्सव नव्हता, तर तो भावी पिढीसाठी एका हरित आणि निरोगी पर्यावरणाचा संदेश देणारा क्षण होता.












