खळबळजनक ! पैशाच्या वादातून व्यसनी मुलाने केला पित्याचा खून

नोव्हेंबर 3, 2025 8:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथून एक खळबळजनक घटना समोर आलीय, ज्यात पैशाच्या वादातून व्यसनी मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केल्याची घटना घडली. जगदीश दामू तायडे (६०), असे खून झालेल्या पित्याचे तर गणेश जगदीश तायडे (२५), असे आरोपी मुलाचे नाव आहे.

murder raver

जगदीश यांचा लहान मुलगा गणेश हा व्यसनी असल्यामुळे त्याला नेहमी पैसे पाहिजे असत. आंदलवाडी (ता. रावेर) येथील शेतीचे मला पैसे द्या किंवा बोकड विकून आलेले पैसे द्या, या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गणेश याने डोक्यात लाकडी दांडका घालत मारहाण करून त्यांना जखमी केले.

जगदीश यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या रवींद्र तायडे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुक्ताईनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे आणि पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now