जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे भारताचे लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. उमाकांत चौधरी सर यांनी सरदार पटेल यांच्या महान कार्याची आणि भारताच्या एकीकरणातील त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांच्या विचारांवर चालण्याचे आणि देशाच्या ऐक्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास कॉलेजचे टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेज प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.









