जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही काळात महाराष्ट्रातील काही शहरांची नावे बदलण्यात आली आहे. अशातच आता आणखी एका शहराचं नाव बदलण्यात आले असून त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे नाव बदलाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून आता ‘ईश्वरपूर’ असं ठेवण्यात आलं आहे. या नामकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.हा निर्णय सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. हा बदल प्रादेशिक संस्कृतीचा आणि पारंपरिक ओळखीचा आदर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचं स्थानिकांचं मत आहे

भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं आहे. लवकरच राजपत्र अधिसूचना जारी करण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तर गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही माहिती पाठवण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नामकरणाला दिलेल्या मंजुरीने प्रथम ईस्लापूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येईल. त्यानंतर ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असे नामकरण करण्यात येईल.












