जळगावमध्ये घरात सुरु असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तीन महिला ताब्यात

ऑक्टोबर 25, 2025 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात अवैध वेश्या व्यवसायाचा मोठा प्रकार उघडकीस आला, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील एका घरात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा मारत तीन महिलांना ताब्यात घेतलं आहे.

kunthkhana crime jpg webp

या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील वाघ नगर भागातील एका ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, त्यांनी एक विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

या पथकाने वाघ नगर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यादरम्यान, तीन महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईत अ‍ॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) च्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, याचा पोलीस अधिक तपास करत तालुका पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now