जळगावात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने परप्रांतीय प्रौढ जागीच ठार

ऑक्टोबर 24, 2025 3:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२५ । जळगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने परप्रांतीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि २४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. राजेश कटारिया वय ४२ रा. पिंप्री, जि., देवास (मध्यप्रदेश) असे मयताचे नाव असून याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

jalgaon railway station jpg webp

या घटनेबाबत असे की, राजेश कटारिया हा जळगाव रेल्वे स्थानकाजवळ आला असता त्याला एका रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागला. ही घटना शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता घडली असून या अपघातात राजेश हा गंभीर जखमी झाल्याने रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी तातडीने धाव घेवून त्याला जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले, दरम्यान मयताची ओळख पटल्यानंतर त्यांचे नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यानंतर सकाळी ११ वाजता शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now