प्रवाशांना दिवाळी बोनस! जळगाव विभागाकडून 142 गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

ऑक्टोबर 15, 2025 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने गावी जाणाऱ्यांची एसटी बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. जळगाव विभागाने तब्बल १४२ वाढीव बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळही टळणार आहे.

bs

दिवाळीनिमित्त राज्यभरातील एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबईतून २५० पेक्षा जास्त, पुणे विभागातून ५९८ आणि रायगड जिल्ह्यातून ५० जादा बसेस धावणार आहेत. या विशेष फेऱ्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू राहतील. गुजरातमधील सुरत, बारडोली, वापी, उधना, सोनगड भागातील मूळ खान्देशी प्रवाशांच्या संख्येतही दिवाळीच्या सुटीत मोठ्या संख्येने वाढ होते.

अकोला, नंदुरबारसाठी ‘ई-बस’ धावणार
अकोला आणि नंदुरबारच्या प्रवासासाठी १२ मीटर लांबीची ई-बस सेवा देणार आहे. त्यामुळे धुळे आणि नंदुरबारच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी दिवाळीमध्ये मिळणार आहे.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडून विविध मार्गावर आजपासून दररोज ५५ जादा बस सोडण्यात येत आहेत.नागपूर, पुणे, नाशिक, जळगाव, भुसावळ, अकोला, धुळे, शिर्डी, बुलढाणा व लातूर मार्गावर जादा बस सोडण्यात येतील. दरम्यान यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखरूप होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील आगारनिहाय हंगामी वाढीव बससेवा

जळगाव मधून : चिंचवड, चोपडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, शहादा व अकोला, नंदुरबारसाठी ई-बससेवा.
यावल मधून : अकोला, चिंचवड, उधना.
चाळीसगाव मधून : त्र्यंबकेश्वर, शिर्डी, जळगाव, नाशिक, चोपडा
अमळनेर मधून : मुंबई, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, उधना
चोपडा मधून : अकोला, शिर्डी, बदलापूर, उधना, चिंचवड
जामनेर मधून : छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, नाशिक, धुळे, नाशिक, मालेगाव, उधना
रावेर मधून : छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, विठ्ठलवाडी
मुक्ताईनगर मधून : कल्याण, त्र्यंबकेश्वर, नाशिक, धुळे.
पाचोरा मधून : चिंचवड, नंदुरबार, कल्याण.
भुसावळमधून : चिंचवड, नाशिक
एरंडोल मधून : बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, शिरपूर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now