जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । जळगावमधून पुन्हा एकदा हादरवणारा प्रकार समोर आला असून, शहरातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सलग दुसऱ्या घटनेनं खळबळ उडाली असून नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

जळगाव शहरासह जिल्ह्यात आधीच गुहेगारी डोकं वर काढत असल्याचं दिसत असून यातच चोरट्यांनी कहर केला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव शहरातील मेहरून स्मशानभूमीतून छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कार नंतर तिच्या अंगावरील दोन तोळा दागिने हे चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार असती घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर स्मशानभूमी ही सुरक्षित नसल्याचं समोर आले होते

या घटनेला एक आठवडा ही अद्याप पूर्ण झालेला नसताना, तशाच पद्धतीत चोरट्यांनी शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आलेल्या जिजाबाई पाटील यांच्या नातेवाईकांना आला आहे. जळगाव शहरात खडके चाळीत राहणाऱ्या जिजाबाई पाटील यांच्या मृत्यू नंतर त्यांचा शिवाजी नगर स्मशानभूमीतू दोन दिवसापूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
आज (दि १३ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास त्यांचं नातेवाईक असती घेण्यासाठी आले असता त्यांना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह असती गायब झाल्याचं लक्षात आले. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्राम सोन्याचे दागिने देखील यावेळी गायब झाल्याचं लक्षात आल्याने,नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
चोरट्यांनी दागिने लंपास केले असले तरी मयताच्या भीतीने अंत्य संस्कार केलेल्या ठिकाणी पंच पक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवल्याचे आढळले आहे










