शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; ३५,४४० कोटींच्या योजनेचं उद्घाटन

ऑक्टोबर 11, 2025 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कृषी क्षेत्रासाठी दोन प्रमुख योजना सुरू केल्या. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) या योजना सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांनी ११,४४० कोटी रुपयांच्या डाळी उत्पादन अभियान योजना आणि २४,००० कोटी रुपयांच्या पंतप्रधान धन धन कृषी योजनेचे उद्घाटन केले.

farmer 3 jpg webp

त्यांनी आंध्र प्रदेशात ८१५ कोटी रुपयांच्या एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन सेवा, उत्तराखंडमध्ये ट्राउट मत्स्यपालन, नागालँडमध्ये एकात्मिक एक्वा पार्क, पुद्दुचेरीमध्ये स्मार्ट फिशिंग हार्बर आणि ओडिशातील हिराकुड येथे प्रगत एक्वा पार्क यासह अनेक इतर योजना सुरू केल्या.

धन धन कृषी योजनेअंतर्गत, पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवण्याचे, शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे, सिंचन आणि पीक विविधता सुधारण्याचे आणि पीक व्यवस्थापन सुधारण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांनी देशाला डाळींमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशन योजनेचीही सुरुवात केली. ही योजना ११,४४० कोटी रुपयांची आहे. पंतप्रधानांनी १७ वेगवेगळ्या पशुपालन प्रकल्पांसाठी अंदाजे १,१६६ कोटी रुपये जाहीर केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now