खुशखबर! जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू; 26 पासून मुंबईसाठी दररोज सेवा, वेळापत्रक अन् तिकिट दर तपासून घ्या..

ऑक्टोबर 9, 2025 1:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपब्लध होणार आहे. तर दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झालीय. दिवाळीच्या सणापूर्वी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

air

खरंतर सध्या दिवाळी सारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून दिवाळी काळात अनेक कुटूंब परिवारसह गावाकडे येतात. दिवाळीसाठी आधीच रेल्वे तिकीट बुक केले जात असल्यानं अनेकांना तिकीट मिळत नाही. ज्यामुळे बस किंवा इतर साधनाने घर गाठतात. आता जळगाव येथील विमानतळावरून ‘अलायन्स एअर’ आणि ‘उडान’ योजनेंतर्गत विविध शहरातून विमानसेवा पुरविली जात असल्यानं थेट विमानाने जळगाव गाठता येणार आहे,

सध्या ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. तर अलायन्स एअर कडून मुंबईसाठी आठवड्यातून चार दिवस सेवा सुरु होती. मात्र आता प्रवाशांचा प्रतिसाद बघता अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. मुंबईकडे व्यापार, उद्योग, मंत्रालयीन कामकाज, रुग्णालयीन उपचार यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. आता मात्र जळगाव-मुंबईसाठी दररोज सेवा सुरू झाल्याने केवळ दीड तासात मुंबई गाठता येणार आहे

याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुन्हा सुरू झाली असून, आठवड्यातील चार दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

वेळापत्रक अन् तिकिटाचे पैसे?

सध्या जळगाव-अहमदाबाद विमानसेवेसाठी सुपर सेव्हरमध्ये १६८० रुपये तिकीट दर आहे. जळगाव विमानतळावरून सायंकाळी ७ वाजून २० मिनिटाने अहमदाबादसाठी विमान उड्डाण भरेल. ही सेवा जळगावहून रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरु असेल. तर अहमदाबाद – जळगाव विमानसेवेसाठी देखील सुपर सेव्हरमध्ये १६८० रुपये तिकीट दर आहे. अहमदाबाद विमानतळावरून सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटाने जळगावसाठी विमान उड्डाण भरेल. तर सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटाने जळगाव विमानतळावर पोहोचेल. अहमदाबादहुन ही सेवा रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरु असेल.

तर मुंबईहुन जळगावसाठी सुपर सेव्हरमध्ये २५०० ते ३००० रुपये तिकीट दर आहे. मुंबई विमानतळावरून सायंकाळी ७ वाजून १० मिनिटाने जळगावसाठी विमान उड्डाण भरेल. तर रात्री ८ वाजून २५ मिनिटाने जळगाव विमानतळावर पोहोचेल. जळगावहुन मुंबईसाठी सध्या सुपर सेव्हरमध्ये तिकीट दर २१०० रुपये इतके आहे जळगावहुन रात्री ८ वाजून ५० मिनिटाने मुंबईसाठी विमान उड्डाण भरेल. तर मुंबई विमानतळावर रात्री १० वाजून १० मिनिटाने पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहुन जळगावसाठी ही सेवा रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहील. तर जळगावहुन मुंबईसाठी देखील ही सेवा रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुरु राहील. २६ ऑक्टोबरपासून मात्र दोन्ही बाजूने दररोज सेवा उपब्लध असेल.

(अलायन्स एअरकडून श्रेणीनुसार तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत. आम्ही फक्त एकच श्रेणीचे दर दर्शविले आहेत. आणि ते सध्या दाखवीत असल्याप्रमाणे आहेत.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now