Jalgaon : लाच स्वीकारताना सरपंचासह तिघांना जळगाव एसीबीने ठोकल्या बेड्या

ऑक्टोबर 8, 2025 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचासह तिघांना ८० लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली आहे. भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल) असं सरपंचाचे नाव असून या कारवाईने ग्रामपंचायतीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेत एक कोटी 50 लाख 23 हजार 321 रुपयांचे काम केले आहे व एक कोटी 27 लाख 23 हजार 321 रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे, तर उर्वरीत 23 लाख रुपये प्रलंबित असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रकरण सादर केले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी सरपंच यांचा करारनामा अपूर्ण असल्याने देयक प्रलंबित होते. सरपंच भानुदास मते व सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (38, युनियन बँकेजवळ, एरंडोल) यांची 6 ऑक्टोबर रोजी भेट घेतल्यानंतर त्यांनी हस्तांतरनामा देण्यासाठी एक लाखांची लाच मागिली व 80 हजार रुपये स्वीकारण्यावर तडजोड केली. 7 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील (49, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचा इशारा केल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर सरपंच व सदस्य पतीला एसीबीकडे बेड्या ठोकल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now