जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेतून पडून जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव-पाचोरा दरम्यानच्या माहेजी रेल्वे स्थानकानजीक घडली.मोहसीन खान मन्सूरखान सिकलगर (वय ३७, रा. कासमवाडी) असं मयातचे नाव असून याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहसीन खान हे गुरुवारी कामासाठी पाचोरा येथे गेले होते. तेथून ते रात्री रेल्वेने घरी परतत असताना माहेजी नजीक त्यांचा अपघात झाला. दुसऱ्या रेल्वेच्या चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच स्थानक प्रमुखांना माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात रेल्वेचे तिकीट, मोबाईल व चार्जर सापडले. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोबाईलमधील शेवटच्या डायल केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तो क्रमांक पाचोरा येथील त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीचा निघाला. या व्यक्तीनेच पुढे मयताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









