बोंबला ! सायबर चोरट्यांनी जळगावच्या पोलिसालाही लावला १.३२ लाखांचा चुना, अशी केली फसवणूक?

ऑक्टोबर 3, 2025 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. यात सुशिक्षित लोकही सायबर फसवणुकीला बळी पडत आहे. अशातच जळगावातील एका पोलीस कर्मचाऱ्यालाच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १,३२,१४२ रुपयांच्या वस्तू परस्पर खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

fraud jpg webp

नेमकी घटना काय?

प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४, रा. शिवधाम मंदिराजवळ, निमखेडी रोड) हे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांना २५ सप्टेंबर – रोजी मोबाइलवर फोन आला. फोन करणाऱ्याने स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत आहे असे सांगून तुमचे क्रेडिट कार्ड व्यवहार न झाल्याने आटो कॅन्सल झाले आहे. त्यापोटी तुम्हाला ३ हजार भरावे लागतील. ते भरावे लागू नये म्हणून मी विचारतो ती माहिती द्या, असे सांगून ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली. त्यामुळे भामट्याने ठाकूर यांना पासवर्ड विचारला नाही. तुमचे कार्ड लवकरच पुन्हा सुरू करू असे सांगून फोन कट केला.

१५ मिनिटांत खरेदी

ठाकूर यांच्या मोबाइलवर काही वेळाने क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे मेसेज येऊ लागले. अवघ्या १५ मिनिटांत चार ते पाच मेसेज आले. त्यातून १,३२,१४२ रुपयांची खरेदी झाल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ठाकूर यांनी बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क करून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now