रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक अहवाल आला, ड्रग्स सेवन केलंय कि नाही?

ऑक्टोबर 1, 2025 4:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये प्रांजल खेवलकर आणि इतरांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्जचे सेवन केले नाही अशी माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा भेटला आहे.

pranjal

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडी भागामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्या पार्टीमध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले होते. प्रांजल खेवलकर यांच्यासह अटक केलेल्या इतरांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं आहे की नाही त्यांचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. या फॉरेन्सिक अहवालामुळे मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी हे फॉरेन्सिकचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत, आणि त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. आणि तेच रिपोर्ट आता पोलिसांनी चार्जसीटमध्ये देखील दिलेले आहेत, तेच रिपोर्ट आता न्यायालयात देखील सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये होते. या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now