जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । सणांचा कालावधी सुरु होत असताना सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी भरारी घेतली असून यामुळे सोने-चांदी खरेदी जणू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. दरम्यान आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे दोन्ही धातूंच्या दराने आता नवा उच्चांक गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे. एन दसऱ्याच्या तोंडावर ही वाढ झाल्याने ग्राहकांसाठी मात्र हि बाब काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक झाली आहे.

काय आहे सोन्याचा नवीन दर?
आज ३० सप्टेंबर रोजी २४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,४२० रूपयांची वाढ होऊन ते १,१८,३१० रुपयावर पोहोचले. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,३०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०८,४५० रूपये मोजावे लागतील. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,०६० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८८, ७३० रूपये मोजावे लागतील.

चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच असल्याचे चित्र आहे. आज प्रति किलो चांदीच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५१,००० रूपये मोजावे लागतील.
कधी रशिया युक्रेन युद्ध, तर कधी डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ धोरण, तर कधी अमेरिकन फेडरल बँकांनी घडविलेले व्याज दर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मागच्या काही महिन्यापासून सोने-चांदी दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसत आहे. आगामी दिवाळी आणि लग्नसराईपर्यंत सोन्या चांदीचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे












