दुर्दैवी ! इलेक्ट्रिक पोलवरून पडून झिरो वायरमनचा मृत्यू; धरणगावातील घटना

सप्टेंबर 25, 2025 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धरणगाव येथे आज २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव) असं मयत झिरो वायरमनचं नाव असून याबाबत धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

dilip bhil

दिलीप भिल हा गारखेडा गावात आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. ते मागच्या १० वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होता. दुरुस्तीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता.

नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांब्यावर काम करण्यासाठी गेला होता. यावेळी दिलीप भिल खांब्यावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. (नेमका ईलेक्टीक शॉक लागला किंवा तोल जावून पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.) खांब्यावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ उचलून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप याला मृत घोषित केले. या संदर्भात धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दिलीप भिल हा कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ असल्याने आणि कामावर असताना अपघात झाल्याने, मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now