सर्वसामान्यांसाठी खुशखबर! दूध, तूप, लोणी स्वस्त झाले, नवीन दर तपासून घ्या..

सप्टेंबर 16, 2025 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२५ । केंद्र सरकारने जीएसटी कमी करून महागाईपासून लोकांना दिलासा देण्याची घोषणा केली. २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील सामान्य जनतेला मोठा लाभ होणार आहे. मदर डेअरीनं आपल्या उत्पादनांचे दर कमी केले. दूध, तूप, लोणी आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे दर कमी झाले आहेत.

dudh tup

कमी केलेल्या किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जीएसटी सुधारणांमुळे ही कपात करण्यात आलीय. ज्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी झाले किंवा रद्द करण्यात आले. मदर डेअरीने सांगितले की त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ आता शून्य-कर श्रेणीत किंवा सर्वात कमी ५% स्लॅबमध्ये येतो. पनीर, बटर, चीज, तूप, मिल्कशेक आणि आईस्क्रीम यांसारख्या रोजच्या आवडीच्या पदार्थांच्या किमतीही कमी होणार आहेत.

उदाहरणार्थ, ५०० ग्रॅम बटरचा पॅक आता ३०५ रुपयांऐवजी २८५ रुपयांवर येईल. तर बटरस्कॉच कोन आइस्क्रीमची किंमत कमी होऊन ते ३५ रुपयांवरून ३० रुपयांवर येणार आहे. दरम्यान दूध पाउच स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका, कारण ते नेहमीच जीएसटीमधून मुक्त राहिले आहे. दर कपात UHT दुधावर लागू आहे, एक लिटर टोन्ड टेट्रा पॅक दुधाची किंमत ७७ रुपयांवरून ७५ रुपयांनी कमी होईल. तुपाच्या किमतीत झालेल्या कपातीकडे पाहिल्यास, १ लिटर कार्टन पॅकची किंमत ६७५ रुपयांवरून ६४५ रुपये झाली आहे, तर ५०० मिली पॅकची किंमत ३४५ रुपयांवरून ३३० रुपये झाली आहे. १ लिटर टिन पॅकच्या तुपाची किंमत प्रति लिटर ३० रुपयांनी कमी झाली आहे आणि ती ७५० रुपयांवरून ७२० रुपयांवर आली आहे.

दरम्यान पोली मिल्क पॅक म्हणजेच फुल क्रीम दूध, टोन्ड दूध, गाईचे दूध इ.) नेहमीच जीएसटीमधून सूट देण्यात आली असून त्यावर अजूनही सूट आहे. तसेच अमूल दूध डेअरीनेही आधीच दराबाबत स्पष्ट केलंय की, ते दुधाचे दर कमी करणार नाहीत. कारण त्यांनी दुधावर कोणतेच कर लावले नाहीत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now