जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकरी आत्म@# हत्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव तालुक्यातील देव्हारी येथील शेतकऱ्याने कर्जबारीला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याची उघडकीस आली आहे. राजू शंकर तळेकर (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

देव्हारी येथील शेतकरी राजू शंकर तळेकर यांनी शेतातच विष प्राशन करून आत्म@# हत्या केली. राजू तळेकर यांचे देव्हारी शिवारात शेत असून त्यांनी कापसाची लागवड केली आहे. यंदा अति पावसामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यामुळे यातून चांगले उत्पादन येण्याची शेतकऱ्याची आशा मावळली आहे. तर शेतीसाठी अगोदरच विकास सोसायटी व खासगी, असे सात ते आठ लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. शेतातून उत्पादन येणार नसल्याने कर्ज फेड कशी करायची; या विचारात त्यामुळे ते तणावात असायचे.

तणावात असलेल्या राजू तळेकर यांनी ५ सप्टेंबरला शेतात जाऊन विष प्राशन केले. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच तळेकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीयांची एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.







