जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात असून यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेद्वारे दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना राबविल्या जात असून या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना १५०० रूपये दिले जात आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगाचे अर्थसहाय्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेत आता १ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. आता त्यांच्या खात्यावर २५०० रुपये मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana)
संजय गांधी निराधार योजनेत समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत राज्यातील महिला, मागासवर्गीय समूदाय, आदिवासी आणि दुर्बल घटकांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जायचे. आता या योजनेच्या दिव्यांगांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे.
श्रावणबाळ योजना
श्रावणबाळ योजनेतदेखील लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आता लाभार्थ्यांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहेत.












