प्रांजल खेवलकरविरोधात पुणे पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती

ऑगस्ट 26, 2025 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरच्या अडचणी वाढताना दिसत आहे. प्रांजल खेवलकरविरोधात पुणे पोलिसांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे.

pranjal

खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडले आहेत, अशे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केल्याचे सांगण्यात आलेय. हे सर्व सांगत पोलिसांनी खेवलकर यांची कोठडी मागवून घेतली.

दरम्यान, सात ते आठ महिलांनी पोलिसांसोबत संपर्क केला असून तक्रार दाखल करणार असल्याचे समजतेय. महिलांकडे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. महिलांकडून तक्रारी आल्यास प्रांजल खेवलकर यांच्यावर नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now