जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२५ । सोन्यासह दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहे. दरम्यान जळगावच्या सुवर्ण नगरीत या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोने दरात घसरण दिसून आली होती. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा दर एक लाखाच्या खाली आल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ दिसून आली. सोबतच चांदीचा देखील भाव वधारला आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आठवड्याभरात गणेशोत्सव सुरु होणार असल्यामुळे अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात.परंतु आता सोने पुन्हा महागल्याने सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

काय आहे आता जळगावात सोने चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सोने दरात किरकोळ १०० रुपयांची वाढ झाली. यांनतर आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९९,६०० (जीएसटी १०२५८८) रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,३०३ (९४०४२) रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चांदी दर १ हजारांनी वाढून विनाजीएसटी ११५००० रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोने दरात घसरण झाली.त्यात ८०० रुपयांहून अधिकची घसरण झाली होती. मात्र गुरुवार आणि शुक्रवारी या दोन दिवसात सोने दरात ६०० रुपयांहून अधिकची वाढ झाली. दुसरीकडे चांदी दरात देखील गेल्या दोन दिवसात २ हजाराहून अधिकची वाढ झाली. दरम्यान आता आगामी सणासुदीच्या तोंडावर सोने चांदी दर पुन्हा वाढताना दिसत असून यामुळे आगामी दिवसात सोन्या-चांदीचा दर कमी होणार की वाढणार ? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.












