जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । तुम्हीही जर रेशनकार्डधारक आणि सरकारच्या मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे रेशन कार्डची केवायसी करण्याची अंतिम तारीख उलटून गेली असून अद्यापही ज्यांनी केवायसी केले नाही त्यांना आता अन्नधान्याचा लाभदेखील घेता येणार नाही. यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने पाऊलदेखील उचलले आहे.

अनेक रेशन कार्डधारकांनी केवायसी केले परंतु अनेकांनी अजून केवायसी केले असून त्यामुळे त्यांना आता धान्य मिळणार नाहीये. यापुढे केवायसी करण्याची मुदतदेखील वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे केवायसी न करण्याचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केवायसीची मुदत संपल्यामुळे दीड लाख लाभार्थी नोंदणी करु शकले नाही. त्यामुळे त्यांना आता धान्याचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत महिन्याकाठी कोट्यवधी गरीब नागरिकांना धान्य वितरित केले जाते. प्रत्येक लाभार्थ्याला केवायसी करणे अनिवार्य आहे.
केवायसी न केल्यास काय होणार?
केंद्र सरकारसह राज्य सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी अनेकदा मुदतवाढदेखील देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी केवायसी केले परंतु अनेकांचे केवायसी करणे अजून बाकी आहे. जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुम्हाला चांगलाच फटका बसणार आहे. या लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाणार आहे. याचसोबत त्यांना आता धान्यदेखील मिळणार नाहीये. त्यामुळे भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.












