Vivo-Realme चे टेन्शन वाढले ! POCO चा बजेटवाला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच!

ऑगस्ट 14, 2025 3:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । तुम्हीही बजेटवाला आणि शक्तिशाली बॅटरीवाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी ही बातमी आहे. POCO ने नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Poco M7 Plus 5G

Poco M7 Plus 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला. शक्तिशाली 7000 mAh बॅटरीसह लाँच झालेल्या या नवीनतम Poco स्मार्टफोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 16 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळेल. या फोनला चार वर्षांसाठी दोन OS अपग्रेड आणि सुरक्षा अपडेट मिळत राहतील. या फोनची वैशिष्टये जाणून घेऊया.

Poco M7 Plus 5G ची भारतात किंमत

हा फोन दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे, 6 GB / 128 GB आणि 8 GB / 256 GB. 6GB RAM + 128GB स्टोरेजसाठी किंमत 13,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजसाठी 14,999 रुपये. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. क्रोम सिल्व्हर, अ‍ॅक्वा ब्लू आणि कार्बन ब्लॅक असे तीन रंग आहे. या फोनची विक्री ग्राहकांसाठी 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. लाँच ऑफरमध्ये HDFC, ICICI आणि SBI कार्डवर 1000 रुपयांची सूट, 1000 रुपयांचा एक्सचेंज लाभ आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी हा बजेट फोन अधिक आकर्षक बनतो.

वैशिष्ट्ये

POCO M7 Plus 5G हा फोन जो M6 Plus चा उत्तराधिकारी आहे. या नवीन फोनमध्ये 6.9-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि सेंटर पंच होल कटआउटसह येतो. कंपनीच्या मते, हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. स्क्रीनची पीक ब्राइटनेस 550 निट्स आहे आणि संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे. फोन अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएसवर काम करतो आणि ड्युअल सिम सपोर्टसह येतो.

कॅमेरा अन् बॅटरी

फोटोग्राफीसाठी POCO M7 Plus 5G मध्ये 50 मेगापिक्सेल मेन लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. सुरक्षा सुविधेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पॉवरसाठी 7000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या श्रेणीत, Poco चा हा नवीनतम फोन Vivo T4X 5G, Realme P3 5G, iQOO Z10X, Redmi 13 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडक स्पर्धा देईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now