धरणगावात खळबळ ! दारुसाठी पैसे न दिल्याने विळा मारून पित्याला संपविले, मुलाला अटक

ऑगस्ट 12, 2025 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पित्यावरच विळ्याने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या पित्याचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. छगन यादव कोळी (७५) असे मृत पित्याचे तर समाधान छगन कोळी (४२) असे संशयित मुलाचे नाव आहे.

crime 2 jpg webp

याबाबत राजू सीताराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगा समाधान कोळी याच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला अटक करण्यात आली आहे.

चांदसर येथे दि.५ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छगन कोळी व त्यांचा मुलगा समाधान यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. समाधान हा वडिलांकडे दारुसाठी पैसे मागायचा आणि यासाठी त्रासही देत होता. ५ ऑगस्ट रोजी त्याने वडिलांकडे दारुसाठी पैसे मागितले.

पण वडिलांनी पैसे न दिल्याने समाधान याने घरात असलेल्या विळ्याने वडिलांच्या पोटावर वार केले. यात ते जखमी झाले. त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवार दि. ११ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now