दुचाकी अपघातात असोद्यातील तरुणाचा मृत्यू

जून 15, 2021 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । रस्त्यात आडव्या आलेल्या नीलगाईला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री शेळगाव भादली रस्त्यावर घडली. श्याम शांताराम कोळी (वय ३५ रा. आसोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

asoda accident

श्याम कोळी हे रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास हे घरी जात असताना रस्त्यावर अचानक दुचाकीची नीलगाईला धडक बसली. त्यात श्याम कोळी यांचा मृत्यू झाला. पहाटे शेतात जाणाऱ्या भादलीच्या शेतकर्यांमुळे हा प्रकार समोर आला. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी ६ वाजता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने उघडकीला आला.

 श्याम कोळी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now