आगामी निवडणुकांपूर्वी जळगाव जिल्ह्यात मोठे राजकीय भूकंप; माजी आमदारासह अनेक दिग्गज महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश घेणार

ऑगस्ट 7, 2025 9:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी जळगाव जिल्ह्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे. कारण येत्या काही दिवसांत विरोधी पक्षामधील एका माजी आमदारासह अनेक दिग्गज सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

mahayuti

त्यात अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, पाचोऱ्याच्या वैशाली सूर्यवंशी यांचाही समावेश असल्याचे समजते. येत्या महिनाभरात अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत शिरीष चौधरी यांनी देखील दुजोरा दिला आहे. तर उद्धव सेनेकडून पाचोऱ्यात विधानसभेच्या उमेदवार असलेल्या वैशाली सूर्यवंशी या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. तसेच याखेरीज जळगाव मनपातील अनेक माजी नगरसेवक पुढील दोन आठवड्यांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका जिल्हा निवडणुकांपूर्वीही परिषदचे काही माजी सदस्य आणि माजी नगरसेवक सत्ताधारी महायुतीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्यात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रमुख विरोधक सत्ताधारी महायुतीत जात असल्याने, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच लढत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now