भुसावळचे दोघे जिल्ह्यातून हद्दपार

जुलै 31, 2025 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भुसावळ शहरातील दोघांना प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी अनुक्रमे एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले. याबाबतचे आदेश काढण्यात आले.

arrested

गिरीश गोकुळ जोहरी (वय २०, रा. दीनदयाल नगर, भुसावळ) याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम 4E(8)(37) ( overline 9 ) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. हद्दपारीच्या कालावधीत तो उपविभागीय दंडाधिकारी किंवा शासनाच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाही.

तसेच शम्मी प्रल्हाद चावरिया (वय ४०, रा. वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याला सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. त्यालाही तत्काळ जिल्हा सोडावा लागेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now