लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! जुलैच्या हप्त्यासाठी निधी वितरीत, खात्यात कधी जमा होणार 1500 रुपये?

जुलै 31, 2025 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाहीय. यामुळे अद्याप जुलैच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.

ladki bahin

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग केला आहे. काल ३० जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. यात जुलैच्या हप्त्यासाठी २९८४ कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होऊ शकतात.

जुलैच्या हप्त्यासाठी निधी वर्ग केला असला तरीही आता ऑगस्टच्या हप्त्याचीही चर्चा सुरु झाली आहे. यातच जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते पैसे नेमक कधी येणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना ३०००रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सण मात्र चांगलाच आनंदात जाईल असं दिसतंय.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेतून तब्बल २६.३४ लाख महिलांना बाद करण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या महिला निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत. उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now