लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या ‘या’ ४ योजना बंद? शेतकऱ्यांनाही बसणार फटका

जुलै 30, 2025 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२५ । विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती.या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जवळपास अडीच कोटी महिलांना हे पैसे दिले जातात. या योजनेचे आतापर्यंत १२ महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता १३वा हप्त्याचे देखील लवकरच पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या खर्चामुळे दर महिन्याला सरकारी तिजोरीवर भार वाढत आहेत. याचेच पडसाद आता पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे ४ योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

ladki bahin yojan

लाडकी बहीण योजनेमुळे ४ योजनांना ब्रेक लागणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वित्त विभागाने माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांसाठी १.३६ लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्राकडून घेण्यात आले होते.मात्र, आता राज्याच्या तिजोरीवर ताण वाढत आहेत. त्यामुळेच १०पैकी चार योजनांना ब्रेक लावला आहे.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांचीही नोंदणी थांबवण्यात आली आहे. याचसोबत या तरुणांना जून आणि जुलैचे विद्यावेतन मिळाले नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे ४ योजनांना ब्रेक लागला आहे.

या ४ योजना बंद

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना
१ रुपयात पीक विमा
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now