⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | किरकोळ व्यवसायाची परवानगी द्यावी ; ३५० हॉकर्स बांधवांचे साकडे

किरकोळ व्यवसायाची परवानगी द्यावी ; ३५० हॉकर्स बांधवांचे साकडे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । जळगाव शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्सना फुले मार्केटच्या आतील बाजुस फुटपाथवर योग्य त्या कोविड- १९ चे आणि महापालिका प्रशासनाचे काही नियम व अटी लावून किरकोळ व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  ३५० हॉकर्स बांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते नितीन लढढा, नगरसेवक प्रशांत नाईक यांना देण्यात येऊन न्याय मिळवून देण्याबाबत साकडे घालण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटच्या आतील बाजुस फुटपाथ वर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किरकोळ वस्तूंची विक्री करून तसेच महानगरपालीकेचा कर भरुन शहराच्या आर्थिक विकासात भर टाकण्याचा तसेच ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे कार्य करीत आहोत. परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोविड- १९ विषाणुच्या महामारीमुळे आज आमचे व्यवसाय बंद होवुन परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय बंद असल्याने मुलांचे शिक्षण थांबले आहे. काही हॉकर्स बांधवांच्या  आई-वडीलांना औषधोपचारासाठी पैसे नाहीत. व्यवसाय बंद असल्याने बँकेचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. कुठूनही आर्थिक मदत होत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार होवुन वाम मार्गाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत हातमजुरीवर व्यवसाय करीत असतांना आम्ही महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या कराचा वेळोवेळी भरणा केलेला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

आत्महत्या शिवाय पर्याय नाही

महानगरपालिकेचे हॉकर्स  नोंदणीकृत  असून वेळोवेळी महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये सामाजिक काम व जातीय सलोखा कायम ठेवण्याचे कार्य करीत आहोत. आजपर्यंत महानगरपालिकेने दिलेल्या रहदारी नियमांचे सुध्दा पालन करीत आहोत. मात्र, व्यवसाय संपूर्ण बंद असून अजून काही दिवस असेच सर्व व्यवसाय  बंद राहिल्यास आम्हाला आत्महत्या करणे शिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने अनलॉक सुरु केलेले असल्याने व व्यापारी संकुले व इतर सर्व सेवा सुरु झाल्या असल्याने शहरातील सर्व हॉकर्सवरच कारवाई का ? हॉकर्स बांधवांवर ईतकी जुलमी कारवाई केली जाते की, त्यांचा संपुर्ण माल जमा केला जातो व परत मिळत नाही. 

तसेच गुन्हे दाखल करण्याची प्रशासनातर्फे वारंवार ताकिद दिली जाते. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे आणि त्यांची टिम एखाद्या चोराप्रमाणे वागणूक देत असल्याची आमची भावना झाली आहे.म. फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्सना फुले मार्केटच्या आतील बाजुस फुटपाथ वर योग्य त्या कोविड- १९ ची व महापालिका प्रशासनाचे जे काही नियम व अटी लावून किरकोळ व्यवसाय करण्यासाठी योग्य त्या पर्यायाने परवानगी देवुन ३५० हॉकर्सचे व त्यांचे सहकारी व त्यांच्यावर अवलंबुन असणाऱ्या परिवारांचे उध्वस्त होणारे संसार वाचविण्यास सहकार्य करावे, अशी तातडीची विनंतीसुद्धा निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियचे अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सचिन जोशी यांच्यासह सय्यद सादिक, मनीष चौधरी, शोएब शेख, मोहम्मद शेख, भरत पवार, ज्ञानबा गुजर, ईश्वर सोनवणे, विक्की सोनवणे, मनोज राणा, शेखर वाणी, प्रेम कटारिया, शुभम सोनार, शरद कोळी, मनोज चौधरी, निहाल अन्सारी, जहांगीर शेख, भय्या चौधरी, इरफान शेख यांच्यासह १५० हॉकर्स बांधवांचे स्वाक्षऱ्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.