जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड १ आणि टेक्निशियन ग्रेड ३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून आज २८ जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता या भरतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. RRB Technician Bharti 2025

या भरतीद्वारे देशभरातील १८ रेल्वे झोन आणि युनिट्ससाठी तब्बल ६,३७४ जागा भरल्या जाणार आहे. तुम्हीही या भरतीसाठी पात्र या असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी अर्ज करण्याची मोठी संधी आहे. 07 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन स्वीकारले जाणार आहेत. RRB Technician Recruitment 2025

रिक्त पदाचा तपशील
टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८० जागा रिक्त आहे. टेक्निशियन ग्रेड ३ ओपन लाइन पदासाठी ६००० जागा रिक्त आहेत. एकूण ६१८० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
भरतीसाठी पात्रता :
टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी ऑफ सायन्स फिजिक्स/ कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इन्स्ट्रुमेशनमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा बीएससी डिग्री इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेला असावा.
टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी कमाल वयोमर्यादा ३६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पगार : या नोकरीसाठी टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी २९,२०० रुपये पगार आहे. टेक्निशियल ग्रेड ३ पदासाठी १९९०० रुपये पगार मिळणार आहे.
परीक्षा शुल्क : अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट मिळाली आहे.
| शुद्धीपत्रक | Click Here |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |












