UPI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून UPI नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल..

जुलै 28, 2025 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२५ । UPI ने डिजिटल पेमेंट सोपे केले आहे. UPI मुळे आपल्याला व्यवहारांसाठी रोख रकमेची आवश्यकता राहिली नाही. तुम्ही कुठेही बसून कोणालाही काही मिनिटांत पेमेंट करू शकता. दरम्यान जर तुम्हीही UPI वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे १ ऑगस्ट २०२५ पासून यूपीआयचे नवीन नियम लागू होणार आहेत.

ofliane upi jpg webp

यूपीआयच्या नियमांत बदल झाल्याने फोनपे, गुगल पे, पेटीएम या अॅपवर परिणाम होणार आहे. यातील काही नियमातं बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयचा वापर अधिक जास्त, सुरक्षित व्हावा, यासाठी हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय बदल होतील?

बॅलन्स चेक मर्यादा

वापरकर्ते बँक खात्यातील शिल्लक किंवा किती पैसे आहेत ते त्यांना हवे तितक्या वेळा तपासू शकत होते. पण आता यामध्ये एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून, वापरकर्ता दिवसातून फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासू शकेल. इतर महत्त्वाचे पेमेंट करताना सर्व्हरवर कोणताही दबाव येऊ नये म्हणून ही मर्यादा ठेवण्यात आली आहे.

लिंक बँक अकाउंट चेक करण्याची लिमिट

अनेकांचे एका मोबाईल नंबरवरुन अनेक बँक खाती असतात. फोन नंबरशी लिंक बँक खात्यातील बॅलेंस तुम्ही फक्त २५ वेळा चेक करु शकतात.

पेमेंट स्टेट्‍स

आता यूजर्स व्यव्हार करताना पेमेंटचा स्टेट्‍स दिवसातून फक्त तीनवेळा चेक करु शकतात.तीन वेळा चेक करताना मध्ये कमीत कमी ९० सेकंडचे अंतर असावे.

ऑटोपे ट्रान्झॅक्शनमध्ये बदल

आता विविध प्लॅटफॉर्मसाठी ऑटोपे करण्याची वेळ निश्चित केली जाईल. सकाळी दहा वाजताच्या आधी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतर तुम्ही ऑटोपे करु शकतात.

पेमेंट रिवर्सलची लिमिट

चार्जबॅक म्हणजेच पेमेंट रिवर्सलची लिमिटदेखील निश्चित करण्यात आली आहे. आता तुम्ही एका महिन्यात १० वेळा आणि एका व्यक्तीकडून ५ वेळाच चार्जबॅक मागू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now